Breaking News

सीकेटीत विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सेंट्रल एक्साइज रायगड कमिशनरेटतर्फे साजर्‍या झालेल्या जीएसटी सप्ताहानिमित्ताने सीकेटी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सीकेटी इंग्रजी मााध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 9) झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कमिशनर श्रवणकुमार तसेच जॉइंट सेके्रटरी राघवेंद्र सिंग, जॉइंट कमिशनर ज्योती अगरवाल, असिस्टंट कमिशनर आयुष कथेरीया हे मान्यवर उपस्थित होते.

 प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी केले. जॉइंट सेक्रटरी राघवेंद्र सिंग यांनी जीएसटीमुळे करप्रणाली सोपी केल्याचे सांगितले. जॉइंट कमिशनर ज्योती अगरवाल यांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या निबंधांमुळे आणि त्यांच्या चित्रकलेने प्रभावित झाल्याचे सांगून मुख्याध्यापक व सहभागी शिक्षकांचे आभार मानले. कमिशनर श्रवणकुमार सर यांनी देशाच्या भावी पिढीला जीएसटी या सर्वात मोठ्या अप्रत्यक्ष करपध्दतीविषयी सजग करण्याकरिता भारत सरकारने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. या वेळी सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत़, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक़ संतोष चव्हाण, पर्यवेक्षक़, मार्गदर्शक शिक्षक़ आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply