Saturday , March 25 2023
Breaking News

व्हॉट्सअॅ=पपासून सावध राहा!

लष्कराचा जवानांना इशारा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था – सोशल मीडियामुळे माहितीची गोपनीयता आता जवळपास नष्टच झाली आहे. एखादी अतिमहत्त्वाची माहितीही आता सोशल मीडियातून नकळत सार्वजनिक होऊन जाते. याचा सर्वाधिक धोका आणि काळजी संरक्षणविषयक माहितीबाबत घेतली जाते. त्यामुळे आता भारतीय लष्करानेही आपल्या जवानांना आणि अधिकार्‍यांना व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करताना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

शत्रूच्या गुप्तचर यंत्रणा अतिमहत्त्वाची माहिती काढून घेण्यासाठी आता सोशल मीडियाचा खुबीने वापर करीत आहेत. त्यामुळे आपल्या सैन्याबाबतची माहिती अजाणतेपणानेही लीक होऊ नये यासाठी लष्कराने आपल्या सर्व कर्मचार्‍यांसह त्यांच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअ‍ॅपवर अतिअ‍ॅक्टिव्ह राहू नका, असा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपचे जे मोठे ग्रुप आहेत त्यावर चर्चा करताना तर विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण अशा ग्रुपमध्ये बरेच लोक आपल्या ओळखीचे नसतात.

जवानांना असा इशारा देताना डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सने (डीजीएमओ) म्हणाले की, शत्रूच्या गुप्तचर यंत्रणा या अधिक हुशार असतात. त्यांच्याकडे माहितीचे विश्लेषण करण्याची मोठी क्षमता असते, तसेच एखादी माहिती तुम्हाला कळणार नाही अशा पद्धतीने सहज काढून घेऊ शकतात. त्यामुळे शक्यतो सोशल मीडियावर जास्त काळ राहू नका. सोशल मीडिया सुरक्षित नाही. त्यामुळे जर अशा प्रकारे कोणी कर्मचारी आपल्या वैयक्तिक फोनवरून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कार्यालयीन माहिती पाठवताना आढळला, तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

लष्करातील कोणत्याही व्यक्तीने सोशल मीडियावर आपली ओळख उघड करू नये. कुठल्याही उपकरणांचे फोटो सोशल मीडियावर टाकू नयेत. त्याचबरोबर इतर महत्त्वाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करू नये. त्याचबरोबर अशा प्रकारची गोपनीय माहिती काढून घेण्यात सराईत असलेल्या हनीट्रॅपपासून स्वतःचा बचाव करावा, असेही डीजीएमओने स्पष्ट केले आहे.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply