Saturday , March 25 2023
Breaking News

वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पनवेल : प्रतिनिधी

महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुशिला घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता नवीन पनवेलमध्ये ‘गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार सोहळा प्रभाग 17 मधील दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांकरिता आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत 95 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व 1500 रुपये, तर 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संदीप पाटील (9769409148), सुहास नलावडे (9769409144), अनंत ठाकूर (9769617431), प्रवीण चव्हाण (9769409211), शिवनाथ पन्हाळे (9819925652) किंवा प्रशांत आवळे (9320871466) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे संस्थापक जगदीश घरत यांनी केले आहे.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply