Breaking News

मुरूड समुद्रकिनार्‍यावर वाहने नेण्यास बंदी

मुरूड : प्रतिनिधी  

पावसाळ्यात मुरूड बीचवर साहसी खेळांना मेरीटाईम बोर्डाने बंदी घातल्यानंतर नगर परिषदेनेही बीचवर वाहने नेण्यास बंदी घातली आहे. त्यासाठी पकटीवर तीन ठिकाणी लोखंडी पोल लावण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात मुरूड समुद्रकिनारी पॅरासेलिंग रायडिंग करताना एकाचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेची दखल घेऊन मेरीटाईम बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रात चारचाकी, दुचाकी वाहने बीचवर नेण्यावर बंदी घालावी, असे आदेश मुरूड नगर परिषदेला दिले होते. त्या अनुषंगाने नगर परिषदेने चारचाकी वाहनांना समुद्रात जाण्यासाठी मज्जाव करण्याकरिता बीचवरील सार्वजनिक बांधकाम खाते कार्यालय, मारूती नाका व वॉच टॉवर या तीन ठिकाणी लोखंडी पोल लावले असल्याची माहिती मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply