Breaking News

खारघरमध्ये गायींची चोरी

खारघर : प्रतिनिधी

खारघर शहरातील सेक्टर 1 रेल्वे स्थानकाच्या मागच्या बाजुस असलेल्या नंदिनी गोशाळेत रविवारी मध्यरात्री 3च्या सुमारास अज्ञात सहा ते सात चोरट्यांनी येथील कर्मचार्‍यांना धमकावुन गोशाळेतील दोन गायी व दोन बैलांना गुर्‍हे गुंगीचे औषध देऊन तेथून पोबारा केला.

टेम्पोच्या सहाय्याने सहा ते सात जणांनी चार गुर्‍हे चोरली.विशेष म्हणजे या घटनेत आणखी गायीला गुंगीचे औषध देऊन चोरण्याचा प्रयत्न केला मात्र ही गाय गरोदर असल्याने गोशाळेत बेशुद्ध अवस्थेत पडल्याने तीला या चोरट्यांना घेऊन जाता आले नाही. या गायीची अवस्था गंभीर असुन तिच्यावर प्राण्यांच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या माध्यमातुन उपचार सुरू आहे. यासंदर्भात गोशाळेचे मालक शैलेश खोतकर यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केली आहे. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला लॉकडाऊन सुरू आहे. ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू असुनदेखील अशाप्रकारे रात्री अपरात्री चोरीच्या घटना कशा काय होतात याबाबत शैलेश खोतकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अशीच घटना घडली होती. त्या घटनेचादेखील कोणताच छडा लागला नसल्याचे खोतकर यांनी सांगितले. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार जगताप हे करीत आहेत.

चोरट्यांचा धुमाकूळ

खारघर शहरात वाहने, दागिने चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यानंतर थेट गायींची चोरींची घटना घडल्याने शहरात चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरांनी शहरात धुमाकूळ घातला असताना पोलिसांचे चोरट्यांवर अंकुश नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply