पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल संघटनेच्या माध्यमातून न्हावा-शेवास्थित पंजाब कॉन्वेर सीएफएसमधील गॅड लॉजिस्टीकच्या 250 कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सोयीसुविधा देण्याचा करारनामा झाला. त्यामुळे या कामगारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या करारनाम्याच्या वेळी गॅड लॉजिस्टीकचे व्यवस्थापकीय संचालक जमील शेख, सहव्यवस्थापकीय संचालक अजीम शेख, व्यवस्थापक विलास वर्तक, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र घरत, युवा नेते शेखर तांडेल, महिला अध्यक्ष समीरा चव्हाण, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, मोतीलाल कोळी, रवींद्र कोरडे, संघटनेचे कायदेशीर सल्लागार अॅड. विनायक कोळी, युनिट अध्यक्ष नीलेश पाटील, तसेच कामगार प्रतिनिधी मोहन पवार, जनार्दन पाटील, जयप्रकाश घरत, विलास म्हात्रे, विजय घरत, देवानंद तांडेल, मयूर म्हात्रे, राजू घरत, धीरज कोळी, नीलेश नाईक, लक्ष्मण म्हात्रे, दिलीप पाटील, अविनाश पाटील, भार्गव म्हात्रे, भूपेंद्र पाटील, मुकेश पाटील, रवी पवार, दत्तात्रेय देशमुख, राकेश म्हात्रे, सूरज पाटील, शिवनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.
– असा आहे करारनामा
चार वर्षांसाठी झालेल्या या करारानुसार कामगारांना पहिल्या वर्षी दरमहा 3000 रुपये, दुसर्या वर्षी दरमहा 1500, तिसर्या वर्षी दरमहा 1500; तर चौथ्या वर्षी एक हजार अशी एकूण सात हजार रुपयांची पगारवाढ, तसेच 24 टक्के बोनस, गणवेश, मेडिक्लेम व इतर सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. या करारामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, कामगार नेते जितेंद्र घरत व पदाधिकार्यांचे आभार मानले.