Breaking News

खालापूर येथे राष्ट्रीय लोकअदालत

खोपोली ः प्रतिनिधी  – खालापूर दिवाणी न्यायालय क स्तर तालुका विधी सेवा समिती अंतर्गत शनिवारी 13 जुलै रोजी खालापूर न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे व वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यात खालापूर तालुक्यातील एकूण 44 ग्रामपंचायती, नगर परिषद, नगरपालिका, महावितरण, बीएसएनएल व विविध बँका आदी स्वरूपाची वादपूर्व प्रकरणे 2476 पैकी 809 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यातून 39,25,557 रु. वसूल करण्यात आले.

प्रलंबित व दिवाणी फौजदारी प्रकरणे एकूण 153 ठेवण्यात आली होती. त्यापैकी 11 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. यातून रक्कम 1,08,000 रु वसूल करण्यात आले.

Check Also

न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; कामांचा आढावा मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या …

Leave a Reply