अलिबाग : सध्या संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या सामन्यांसाठी सट्टा लावणारे एक मोठे रॅकेट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) रायगडने उद्धवस्त केले आहे. यात वेगवेगळे बुकी व त्यांचे मध्यस्थ अशा एकूण 11 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 16 मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. या सर्वांना 11 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी बुधवारी (दि. 7) पत्रकार परिषेदेत दिली.
5 आरोपीत फरारी असून त्यापैकी काही महत्वाचे बुकी हे गुजरात, बेंगलोर व दुबई येथील आहेत. महत्वाचे बुकी असणारे आरोपीत इसम हे गुजरात, बेंगलोर व दुबई येथून सदरचे सट्टा रॅकेट चालवित असल्याची माहिती तपासामध्ये निष्पन्न झाली आहे. फरारी असणा-या बुकीआरोपीतांच्या शोधार्थ खास तपास पथकांची नियुक्ती करण्यात आलेली असून ही पथके गुजरात व बेंगलोर या ठिकाणी रवाना करण्यात आलेली आहेत.
कर्जत तालुक्यातील मौजे खांडपे येथील हॉटेल 007 युनिव्हर्स रिसाँर्टच्या रूम नंबर 120 मध्ये आयपीएल सामन्यावर सट्टा लावला जातो अशी माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या नेत्तृत्वाखीलील पथकाने हॉटेल 007 युनिव्हर्स रिसाँर्टवर छापा टाकला असता कांती करमसीभाई वारसुंगीया, वय-43, रा. कोपरी, ठाणे व प्रकाश पोपट पुजारी, वय-42, रा. मुलूंड, मुंबई हे दोघे आय.पी.एल. मधील किंग्ज ईलेव्हन, पंजाब व मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये सुरू असणा-या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळतांना सापडले. त्यांच्याकडून सट्टा खेळण्यासाठी वापरत असलेले एकूण 5 मोबाईल फोन्स, कॅल्क्यूलेटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
त्यांच्याकडे अधिक तपास केला असता सदरचे आरोपीत हे वेगवेगळया मोबाईल फोन्सच्या माध्यमातून वेगवेगळया मोबाईल अॅप्स व आय.डी. यांच्या मदतीने आय.पी.एल. क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी आढळून आले. दोन्ही आरोपीडून एकूण 20 मोबाईल आय.डी.यांची माहिती मिळून आलेली असून या 20 मोबाईल आय.डी. पैकी एकूण 04 मोबाईल आय.डी. या आरोपीत यांनी सट्टा खेळण्याकरिता वापरल्या असल्याची माहिती तपासा दरम्यान मिळून आलेली आहे. या मोबाईल फोनमध्ये आढळून आलेले सिमकार्ड ही आरोपीनी य इतरांच्या नावांवर नोंदणीकृत करून घेतलेली असल्याचेही त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाले.
रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक.जे.ए.शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उप निरीक्षक सचिन निकाळजे, पोलीस उप निरीक्षक अभिजीत देशमुख व इतर कर्मचारी यांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भा.द.वि.सं.क. 420,465,468,471,34 सह महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 4(अ),5 तसेच इंडियन टेलिग्राफ अॅक्ट 1985 चे कलम 25(क) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक.जे.ए.शेख पुढील तपास करीत आहेत.
Check Also
संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …