मोरा पोलीस ठाण्याच्या वतीने मार्गदर्शन
पनवेल ः वार्ताहर
मोरा सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीने मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माणकेश्वर मंदिर केगाव येथे सागरी सुरक्षा जनजागृती अभियान याविषयी नुकतीच मिटिंग घेण्यात आली. समुद्रातील अनोळखी बोट, समुद्र किनारी इतरत्र अनोळखी फिरणारी व्यक्ती यांची माहिती मोरा सागरी पोलीस ठाण्यात द्यावी, ओएनजीसीच्या, बॉम्बेहाय प्लान्टजवळील फिरणार्या बोटींनी ज्वालाग्रही पदार्थ, अथवा आग लागणार नाही, अशा वापरू नये, कोणत्याही संशयित हालचाली अढळल्यास त्वरित मोरा पोलीस ठाण्यात कळवाव्यात. समुद्रात पोलीस, कस्टम अधिकारी, नेव्हीचे अधिकारी बोटीची व बोटीवर काम करणारे मच्छीमार यांची तपासणी करीत असतील, तर मच्छीमारांनी घाबरून न जाता आपल्याजवळील ओळखपत्र दाखवावीत, बोटीचे कागदपत्र दाखवावीत, पोलीस तुम्हाला काहीच करणार नाहीत. पोलिसांना आपल्या कामात सहकार्य निश्चित करतील, असे आश्वासन मोरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांनी केले. या वेळी इंडियन नेव्हीचे कॅप्टन अभिजित मोहंती, आफताब दरेकर, सागरी सुरक्षा शाखा नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक राजू सोनावणे, उरण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक (गुन्हे) अतुल आहेर, केगाव ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य, महिला, केगाव ग्रामस्थ आदी उपस्थित होते.