लंडन : वृत्तसंस्था
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक क्षणी इंग्लंडला मिळालेल्या चार अतिरिक्त धावांबाबत विजयाचा शिल्पकार बेन स्टोक्सने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तशा प्रकारे धावा मिळविण्याचा माझा हेतू नव्हता. चेंडू माझ्या बॅटला लागून सीमारेषेपार गेला. त्यासाठी मी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची माफी मागितली. मी केनला म्हणालो की, या घटनेसाठी मी न्यूझीलंडची आयुष्यभर माफी मागेन.
अशा पद्धतीने चौकार जाणे थोडेसे वेदनादायी आहे. क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होतात, पण तुमच्याबाबत असे घडू नये अशीच तुमची अपेक्षा असते, असे विल्यमसन म्हणाला.