मुंबई : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गाला स्वराज्याचे नौदलप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवले आहे.
खासदार संभाजीराजे यांनी पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून एका सुसज्ज आरामाराची स्थापना केली होती. म्हणून आजही महाराजांना भारतीय नौदलाचे सरसंस्थापक किंवा जनक असे म्हटले जाते. सागरी सीमांचे रक्षण करण्यात कान्होजी आंग्रे यांच्या योगदानाला तोड नाही. छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब बहाल केला. त्यांचे नाव मुंबई-गोवा महामार्गाला देण्यात यावे.