खारघर ः रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून खारघर सेक्टर 12 येथील गावदेवी मैदानावर आयोजित भाजप सांस्कृतिक महोत्सवाने रसिकांची मने जिंकली. महोत्सवाच्या तिसर्या दिवशी सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या सुमधुर गाण्यांच्या मैफिलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि ‘मराठी बिग बॉस’फेम अंकिता वालावलकर यांनी विशेष उपस्थिती लावली. मुग्धा आणि प्रथमेश यांनी आपल्या बहारदार आवाजाने मैफलीला साज चढवला. त्यांच्या गाण्यांना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका आरती नवघरे, हर्षदा उपाध्याय, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, विजय घरत, महिला मोर्चा शहराध्यक्ष साधना पवार, युवा मोर्चा शहराध्यक्ष नितेश पाटील, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, स्वाती कोळी, कोमल कोळी आदींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संगीत मैफिलीचा आनंद लुटला.
भाजप सांस्कृतिक महोत्सवामध्ये मनोरंजन, इतिहास, कला आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतील प्रसिद्ध मिसळ महोत्सवाचा अनोखा संगम पहायला मिळाला. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे नागरिकांना एक वेगळा अनुभव मिळाला.
Check Also
रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष
रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper