
मुरूड : प्रतिनिधी
भाजपच्या मुरुड तालुका युवती मोर्चा तर्फे गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत गणरायाच्या सभोवताली केलेल्या सर्वोत्तम सजावटीस बक्षीस देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.
मुरूड शहरातील नागरिकांसाठी ही स्पर्धा असून या स्पर्धेत मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवणार्या स्पर्धकास 10 हजार रोख व सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांकास सात हजार रोख व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास पाच हजार व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांकास तीन हजार व सन्मानचिन्ह आणि पाचव्या क्रमांकास दोन हजार व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. आधिक माहिती व प्रवेशासाठी इच्छुकांनी परेश किल्लेकर (भ्रमणध्वनी 7499965587) यांच्याशी सपंर्क साधावा, असे आवाहन भाजप युवती मोर्चा मुरूड तालुका अध्यक्षा भाविका किल्लेकर यांनी केले आहे.
गणेशमुर्तीच्या सभोवती आरास केली जाते. त्यासाठी भाविक त्यासाठी मेहनत घेतात. या सजावटीचे चीज व्हावे, यासाठी मुरूड तालुका भारतीय जनता पक्षातर्फे गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. -भाविका किल्लेकर, तालुका अध्यक्षा,भाजप युवती मोर्चा, मुरूड
RamPrahar – The Panvel Daily Paper