Breaking News

बुद्धिबळ स्पर्धेत समीर कठमाले विजेता

पनवेल : बातमीदार

येथील अस्मिता चेस अ‍ॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमी आणि व रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन यांच्या संयुक्त विद्यामानाने आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत 250हून अधिक स्पर्धक व 200 पालकांचा सहभाग लाभला. अव्वल मानांकित इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाले स्पर्धेचा विजेता ठरला.

स्पर्धेत फीडे मानांकित खेळाडू, तसेच 7,9,11,13,15 वयोगटाखालील, जेष्ठ नागरिक, दिव्यांग व खुल्या वयोगटातील खेळाडू सहभागी झाले होते. स्वीस लीग पद्धतीने ही स्पर्धा आठ फेर्‍यांमध्ये खेळवण्यात आली. अस्मिता चेस अ‍ॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमीच्या अध्यक्षा डॉ. अस्मिता शिर्के, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनचे अध्यक्ष व्ही. सी. म्हात्रे आणि इतरांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. नागावच्या कला संस्कृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अरुण पाटील यांची उपस्थिती लाभली. मुंबईचा मिथिल आजगाईवकरने द्वितीय व पनवेलचा खेळाडू स्नेहल भोसले याने तृतीय क्रमांक पटकाविला. बेस्ट रायगड खेळाडू हा पनवेलचा अक्षय क्षेगावकर ठरला; तर निखिल जोशी दुसरा आला.  विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

गटनिहाय विजेते

7 वर्षाखालील : मुली-सानवी त्रिपाठी; मुले-कार्तिक कर्नाड, श्लोक घोरपडे, कौस्तुभ भगत; 9 वर्षाखालील मुली-क्रिशी चौडकी, जिया शेख, सारा नाईक, अपेक्षा मारबल, अनवी वेदुला; मुले-श्रीहान साबत, रिषभ सिंग, अर्णव दाभाडे, अथर्व सोनी, हिंदोल घोष; 11 वर्षाखालील : मुली-ईनी शेट्टी व कनिष्का शिर्के, विभा नवरे, तेजस्वी शिंदे; मुले-पारस भोईर, आराध्य टिकम, मृगया गोतमारे, आरव आयर, व्ही. देवांश; 13 वर्षाखालील : मुली-सायना चोप्रा, आर्या गायकवाड, नामोम पाधी, स्वराली कोठे, कस्तुरी कांगुटकर; मुले-अमेय शेट्टी, अर्णव नेहेटे, श्रावणी पाटील, अनिकेत सिंग, ओम देशमुख; 15 वर्षाखालील  : मुली-वनश्री कुनेकर, खुशी चौडकी, तन्वी अधिकारी, वेदांती इंगळे, इनास शेख; मुले-प्रणित कोठारी, आकाश छाब्रा, रचित लुंड, अथर्व पांढरपुरे, विहान शेट्टी.

इतर श्रेणीतील विजेते

उत्कृष्ट महिला खेळाडू : संस्कृती महाजन, सुगंधा पाटील; उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू : रघुबर त्यागी, रमण त्रिकाझीपुरम; उत्कृष्ट मानांकित खेळाडू मानांकन 1000-1200 : शंकर साळुंखे, हर्ष घाडगे, सचिन देशमुख; मानांकन 1201-1350 : चैतन्य पंढारकर,  अक्षीत झा, पुनीत डोधिया; मानांकन 1351-1500 : हृदय बुटा, यश वाटारकर, प्रतिक जेंगजे; उत्कृष्ट  बिगरमानांकित : विकास पाटील, अभिजीत पाल, अभिजीत फडके.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply