Breaking News

विंडीजचा ट्वेन्टी-20 संघ जाहीर

भारताविरुद्ध पोलार्ड, रसेल, ब्रेथवेट संघात

केपटाऊन : वृत्तसंस्था

भारतीय संघाविरुद्ध होणार्‍या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा ट्वेन्टी-20 संघ जाहीर करण्यात आला. या संघात किएरॉन पोलार्ड, आंद्रे रसल, कार्लोस ब्रेथवेट, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर यांसारख्या धडाकेबाज फलंदाजांना संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय फिरकीपटू सुनील नरिन याचेही संघात पुनरागमन झाले आहे.

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील टी-20 मालिकेला 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी विंडीजच्या संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये किएरॉन पोलार्ड आणि सुनील नरिन या दोघांचे संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेला आंद्रे रसेलदेखील संघात आहे.

विंडीज क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार यष्टीरक्षक फलंदाज अँथनी ब्रॅम्बल हा 14 खेळाडूंच्या चमूतील नवा गडी आहे. विंडीजच्या देशांतर्गत स्पर्धेत त्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर त्याला मुख्य संघात संधी मिळाली आहे.

भारत वि. विंडीज ट्वेन्टी-20 मालिकेतील तीनपैकी पहिले  दोन सामने फ्लोरिडा येथे 3 व 4 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येतील, तर तिसरा सामना 6 ऑगस्टला गयाना येथे होईल. त्यानंतर तीन वन डे आणि दोन कसोटी सामनेही होणार आहेत.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply