Breaking News

जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये गुरुपौर्णिमा ; वामनराव पै यांचे हजारो अनुयायी उपस्थित

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील भिवपुरी टाटा कॅम्प परिसरात चार वर्षांपूर्वी सद्गुरू वामनराव पै यांनी आपल्या जीवनविद्या मिशनचे ज्ञानपीठ उभे केले. या ठिकाणी सलग आठवडाभर गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. जीवनविद्या मिशनमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त सुरू असलेल्या या कृतज्ञता महोत्सवास सद्गुरूंचे हजारो अनुयायी भेट देत आहेत.

कर्जतच्या वैजनाथ येथे असलेल्या जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये सद्गुरू वामनराव पै यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त जीवनाविद्या मिशनतर्फे कृतज्ञता महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. प्रल्हाद पै यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा महोत्सव सुरू आहे. या वेळी सद्गुरूंच्या प्रवचनांचा व्हिडीओ साठा असलेल्या पेन ड्राइव्हचे प्रकाशन शिवाजी पालव, रत्नागिरी जि.प.चे माजी सभापती दत्ता कदम, व्हिनसचे

सर्वेसर्वा विनायक कारभाटकर, श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या विश्वस्त स्मिता बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास पं. स. सदस्य राहुल विशे, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, कर्जतच्या नगरसेविका प्राची डेरवणकर, संचिता पाटील, स्वामिनी मांजरे, विशाखा जिनघरे यांच्यासह साईली शहासने यांची प्रमुख उपस्थिती होती. कृतज्ञता सोहळ्यात मार्गदर्शन करताना सद्गुरू वामनराव पै यांचे चिरंजीव आणि जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद पै यांनी मानवजातीत देण्याची वृत्ती म्हणजे सेवा करण्याची वृत्ती समजली जाते. हीच वृत्ती आपण अंगीकारण्याची गरज आहे, असे मत मांडले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply