Breaking News

सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये पर्यावरण सप्ताह उत्साहात

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त

येथील जोसेफ हायस्कूलमध्ये पर्यावरण सप्ताह साजरा केला गेला. पर्यावरणीय समस्या, तसेच उज्ज्वल शालेय भविष्यासाठी आपल्या पर्यावरणाचे संरक्षण व जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळेत मजा इंटरएक्टिव्ह शैक्षणिक उपक्रम

राबविण्यात आले.

विद्यार्थ्यांचे शाळेच्या परिसरात आणि शेजारच्या भागामध्ये वृक्षारोपणाचे अभियान आयोजित केले गेले होते. या उत्सवाचाच एक भाग म्हणजे रॅली. शाळा अध्यक्ष डॉ. ऑगस्टिन फ्रॅन्सिस पिंटो यांच्या दृष्टिकोनातून एक व्यक्ती, एक झाड, एक पोषण उपक्रमात पालकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांच्या घरात व सभोवतालच्या आसपास रोपटी लावली.

शिक्षकांनी बियाणे उगवणे याबद्दलदेखील विद्यार्थ्यांना सांगितले, तसेच रोपट्याला मोठ्या झाडात कसे बदलता येते आणि आपल्याला फुले व फळे कशी मिळतात याचे प्रात्यक्षिक दर्शविले गेले.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply