Breaking News

कळंबोलीत महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रम

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबईतील आम्ही उद्योगिनी आणि नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी 26 जुलै रोजी दुपारी 2 ते 4 दरम्यान कळंबोली सेक्टर-5 ई येथील सिडकोच्या मनस्वी स्त्री संसाधन केंद्रात व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक शिष्टाचार या विषयावर उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून मीनल मोहाडीकर आणि शुभांगी तिरोडकर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

या उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये शासनाच्या विविध योजना व व्यावसायिक कौशल्य विकास याबाबत मागदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये नवी मुंबईतील  बचत गट, संस्था व महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9167234016 यावर संपर्क साधावा.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply