खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. शिक्षकांच्या मेहतीमुळे शाळेस अनेक सुयश मिळत आहे. शिक्षकांची मेहनत पाहता त्यांना नोकरीस कायमस्वरूपी रुजू करण्यात आलं आहे. त्यासंदर्भातील पत्र संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी शिक्षकांना देण्यात आले. शिक्षक हा प्रत्येक शाळेचा मुख्य पाया मानला जातो. शिक्षक मेहनती, प्रमाणिक आणि विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान देत असेल, तर विद्यार्थी सुयश संपादित करु शकतात, आणि विद्यार्थ्यांनी सुयश संपादित केलं म्हणजेच शाळेचं नाव उंचवते, तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर स्कूलचे नाव उंचवण्यासाठीची मेहतन शिक्षकांनी घेतली. त्या अनुषंगानं अनेक शिक्षकांना कायमस्वरूपी रुजू करण्यात आलं आहे. त्यासंदर्भातील पत्र शिक्षकांना देण्यात आलं. या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्यासह शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.