Breaking News

टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाच्या शर्यतीत जाँटी र्होड्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळख असणार्‍या दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी र्‍होड्सने भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) अर्ज केला आहे.

दक्षिण अफ्रिका संघासाठी खेळत असताना र्‍होड्स क्षेत्ररक्षक म्हणून खूप मोठे योगदान दिले होते. त्यानंतर त्याची जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळख निर्माण झाली. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याने मुंबई इंडियन्स संघासाठीदेखील महत्त्वाची भूमिका बजावली होती.

भारताचा नवा प्रशिाक्षक कोण असेल याचा निर्णय कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय सल्लागार समिती घेणार आहे. भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक 15 सप्टेंबरपासून सुरू

होणार्‍या दक्षिण आफ्रिका मालिकापूर्वी घोषित करण्यात येईल.

सध्या भारताचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदी आर. श्रीधर आहेत. भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी जाणार असल्यामुळे त्यांचा कार्यकाळ 45 दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply