Breaking News

पनवेलमध्ये राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त

येथील अस्मिता चेस अ‍ॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने येत्या 4 ऑगस्टला प्रथम मिनी जलद चषक विशेष बालवयोगटासाठी भव्य राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आणि खुल्या गटासाठी मिनी ब्लिट्झ (अती जलद) चषक स्पर्धा विरुपाक्ष मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. 

स्पर्धेत 8, 10, 13, 15, 25 वयोगटाखालील, दिव्यांग व फिडे मानांकित खेळाडू भाग घेऊ शकतात. स्वीस लीग पद्धतीने ही स्पर्धा सहा ते आठ फेर्‍यांमध्ये खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना 1 लाख 10 हजार रुपयांची रोख पारितोषिके व शंभरहून अधिक आकर्षक चषक व पदके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी प्रमोद शिर्के हे समन्वयक; तर फिडे अरबिटर अजिंक्य पिंगळे मुख्य पंच म्हणून काम पाहणार आहेत. अधिक माहितीसाठी 8879518955, 9930409789 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply