Breaking News

रिक्षा थांब्यांना पयार्र्यी जागा उपलब्ध करून द्यावी

भाजप युवा मोर्चाची महानगरपालिकेकडे मागणी; वाहतूक पोलिसांना सहाय्यक देण्याचीही सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल शहरातील मोक्याच्या ठिकाणी रिक्षा थांब्याकरिता पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने गुरुवारी (दि. 25) महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना देण्यात आली, तसेच वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांना पालिकेने सहाय्यक कर्मचारी पुरवावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाच्या योजनेंतर्गत रिक्षाचे नवीन परमीट देण्यात आले आहे. नीवन परमीट दिली गेल्याने रिक्षांची संख्या वाढली आहे. वाढती लोकसंख्या व वाहतूक यामुळे अनेक ठिकाणचे रिक्षा थांबे कमी पडत आहेत. यामुळे रिक्षा थांब्यांचे प्रमाण कमी असल्याने चालकांमध्ये नाराजी आहे. परिणामी नागरिकांची गैरसोय होत आहे, शिवाय वाहतूक कोंडीमुळे रिक्षाचालकांचीही गैरसोय होत आहे.

महापालिका प्रशासनाकडून रिक्षा थांब्यांकरिता पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास रिक्षापार्किंगचा प्रश्न कायमचा सुटेल व नागरिकांचीही सोय होईल. शिवाय वाहतूक पोलिसांना पलिकेचा कर्मचारी सहाय्यक म्हणून दिला तर वाहतूक कोंडीचा प्रश्नचही निकाली निघेल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, शहर उपाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, अभिषेक भोपी, सुमेध ठाकूर, शहर चिटणीस अयुफ अकुला, नवीन पनवेल सरचिटणीस विवेक होन, प्रभाग 15 अध्यक्ष रोहित कोळी, खांदा कॉलनी उपाध्यक्ष अनिकेत लाखे, युवा मोर्चा खांदा कॉलनी पदाधिकारी नितेश झुगे व अन्य उपस्थित होते. या निवेदनाची प्रत महानगर पालिकेतील सभागृह नेते परेश ठाकूर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत मिसाळ, उपायुक्त जमीर लेंगरेकर, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply