रत्नागिरी : प्रतिनिधी
परशुराम घाट 25 एप्रिल ते 10 मे या कालावधीत दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत असून बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी-आंबडस-चिपळूणमार्गे वळविण्याबाबतचे आदेश जिल्हा दंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जारी केले आहेत.
पनवेल-महाड-पणजी रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या परशुराम घाटातील महामार्गाच्या चौपदरीकरण कामापैकी 1.20 किमी लांबी ही उंच डोंगररांगा व खोल दर्या आहेत. या 100 मीटरमधील चौथ्या टप्याचे काम अवघड स्वीणपाचे असल्याने त्या ठिकाणी काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेल्या मातीमुळे खाली कार्यरत महामार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच घाटातील चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी व पुढील संभाव्य जीवित व वित्तहानी होवू नये म्हणून वाहतूक काही काळ बंद असणार आहे.
Tags Mumbai-Goa Highway Parshuram Ghat
Check Also
दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन
अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …