Breaking News

आपद्ग्रस्त शेतकर्यांना आवाहन

अलिबाग : नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या अलिबाग तालुक्यातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याकरिता शासनाकडून अनुदान प्राप्त झालेले आहे, मात्र बर्‍याच आपद्ग्रस्त शेतकर्‍यांनी त्यांचे बँकेचे अकाऊंट नंबर संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याकडे दिलेले नसल्याने नुकसान भरपाईची रक्कम बँकेमध्ये जमा करता येत नाही. यासाठी अलिबाग तालुक्यातील सन 2017-18 मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या आपदग्रस्त शेतकर्‍यांनी आपला बँकेचा अकाऊंट नंबर अथवा पासबुकची छायांकीत प्रत संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याकडे पाच दिवसांत जमा करावी, असे आवाहन तहसीलदार सचिन शेजाळ यांनी केले आहे.

महाडमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

पाली : राजर्षि शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून क्रांतिभूमी सामाजिक संस्था महाड आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 28) दुपारी 12 वाजता महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी दहावी व बारावी परीक्षेत विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गोपाळ कांबळे (मो. नं. 9921754068), रवींद्र पाटील (9527815766), सुनील सोरदे (9028342899), दीपक पाटील (7276127977), धम्मशील सावंत (9766253914) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पेण वाशी मंदिरात चोरी

पेण : तालुक्यातील वाशी येथील जगदंबा मंदिराशेजारील साई मंदिर व विठ्ठल मंदिरात अज्ञात व्यक्तीने दानपेटी फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे. वाशी एसटी बस थांब्यासमोरील या मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रोकड चोरट्याने लंपास केली. जगदंबा मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने चोरटा मंदिरात चोरी करताना दिसत आहे. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

साले गु्रपतर्फे आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव

माणगाव : तालुका कुणबी समाज साले गु्रपतर्फे शनिवारी (दि. 27) दुपारी 1.30 वाजता माणगावातील कुणबी भवनात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. गु्रपचे अध्यक्ष भागोजीबुवा डवले यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या समारंभात दहावीमध्ये 80 टक्क्यापेक्षा अधिक व बारावीत 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचा कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कुणबी समाज साले ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply