Breaking News

विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘उरी’चा थरार

सर्जिकल स्ट्राईकचा चित्रपट पाहून नागोठण्यात विद्यार्थी भारावले

नागोठणे : प्रतिनिधी

कारगिलमधील विजयाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी 10 वाजता येथील विद्यार्थ्यांना उरी द सर्जिकल स्ट्राईक हा उरी हल्ल्यावर तयार करण्यात आलेला चित्रपट मोफत दाखविण्यात आला. रोहे तहसील कार्यालयाकडून येथील सुरेश जैन आणि डॉ. मिलिंद धात्रक यांच्या साई चित्रमंदिर या आलिशान चित्रपटगृहात उरी द सर्जिकल स्ट्राईकच्या शोचे आयोजन करण्यात आले होते.

अलिबागमध्ये शहिदांना अभिवादन

अलिबाग : प्रतिनिधी

कारगिल विजय दिनानिमित्त रायगड जिल्हा प्रशासनातर्फे शुक्रवारी (दि. 26) कारगिल युद्धात शहीद झालेले अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथील नीलेश तुणतुणे यांना अभिवादन करण्यात आले. गावाच्या वेशीवर असलेल्या शहीद तुणतुणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, तुणतुणे यांचे कुटुंबीय, ग्रामस्थ, मित्रमंडळी उपस्थित होती. अलिबागमधील महेश चित्रमंदिर येथे उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचा खेळ आयोजित करण्यात आला होता. शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. या वेळी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

खोपोलीत कारगिल दिन

खालापूर : प्रतिनिधी

कारगिल दिनानिमित्त ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाचे शुक्रवारी खोपोली येथील गोल्ड सिनेमा व सॅम्युएल सिनेमा येथे आयोजन केले होते. गोल्ड सिनेमा येथे माजी सैनिक तथा सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार भरत सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपट दाखविण्यात आला. चित्रपट पाहण्यासाठी जनता विद्यालय व केएमसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. या वेळी तहसीलदार ईरेश चप्पलवार, खोपोली पोलीस निरीक्षक बंडगर, मंडळ अधिकारी विश्वास गडदे, तलाठी अभिजित हिवरकर, माधव कावरखे, पुरवठा निरीक्षक संदीप शिंदे, माजी सैनिक संदीप गाढवे, गोल्ड सिनेमाचे मालक राहुल गायकवाड, सॅम्युएल सिनेमाचे मालक रॉबिन सॅम्युएल, कुतुबुद्दीन शेख, आदिक सावंत, संतोष भदाणे, व्यंकट काटकर, तुषार येरूणकार, जनता विद्यालय व केएमसी महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक, खालापूर तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply