कळंबोली, खारघर : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोलीमध्ये दोन उद्याने साकारली आहेत. त्यांचे लोकार्पण तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या एक कोटी रुपयांच्या निधीतून खारघरमधील दोन रस्त्यांच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि.13) झाला.
भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून नागरिकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या वतीने कळंबोली सेक्टर 11 आणि 12 येथे उद्यान बांधण्यात आले असून या उद्यानांचे लोकार्पण तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 50 लाख रुपयांच्या आमदार निधीतून खारघर घरकुल सोसायटी अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण आणि 50 लाख रुपयांच्या निधीतून स्पॅगेटी सोसायटीमधील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
खारघर येथे रस्ते डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभास माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक निलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, भाजप मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला मोर्चा अध्यक्ष साधना पवार, युवा नेते नितेश पाटील, समीर कदम, वॉर्ड अध्यक्ष रामचंद्र पाटील, आनंद मोकल; तर कळंबोली येथे उद्यानाच्या लोकार्पणावेळी भाजप मंडळ अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, राजू शर्मा, बबन मुकादम, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर, युवा मोर्चाचे अमर ठाकूर, सिद्धू शर्मा, शहर सरचिटणीस दिलीप बिष्ट, उत्तर भारतीय जिल्हाध्यक्ष केशव यादव, आबा घाटूकडे, महिला मोर्चा अध्यक्ष मनीषा निकम, चिटणीस दुर्गा सहानी, माथाडी कामगार उपाध्यक्ष रामा मानवर, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस संदीप म्हात्रे, शहर उपाध्यक्ष सुनील ढेंबरे, युवा मोर्चा अध्यक्ष गौरव नाईक, निशांत गिल, चित्रांग शेट्टी, सुभाष कदम, श्रीकांत ठाकूर, संजय दोडके, संदीप भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
Check Also
पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …
RamPrahar – The Panvel Daily Paper