Breaking News

भुशी डॅमवर पर्यटकांना नो एण्ट्री

लोणावळा : प्रतिनिधी

सलग दोन दिवस मुसळधार कोसळल्यानंतर पावसाचा जोर सकाळी काहिसा कमी झाल्याने शनिवारी खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेले भुशी धरण रविवारी सकाळपासून पर्यटकांकरिता खुले करण्यात आले होते, मात्र दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव धरणावर पर्यटकांचे जाणे बंद करण्यात आले, तसेच धरणावर लोणावळा शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.

शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर काहिसा कमी झाल्याने शहरातील विविध भागात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढू लागला. लोणावळा व मावळ तालुक्यासह सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने लोणावळ्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या घटली होती. भुशी धरणावर जाण्यास पर्यटकांना सकाळी मुभा देण्यात आली होती, परंतु दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा एकदा भुशी घरण पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. लोणावळा परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पर्यटकांनी परिस्थितीचा आढावा घेत घराबाहेर पडावे तसेच लोणावळेकर नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर येऊ नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

शहरात पूरस्थिती होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जात असून नगर परिषदेची आपत्कालीन पथके शहरात गस्त घालत आहेत. कोठेही पाणी साचल्याची समस्या निर्माण झाल्यास नगर परिषदेच्या आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply