Breaking News

जीओ केबलचे काम अर्धवट; नागरिकांना त्रास

सुकापूर ः रामप्रहर वृत्त  – सुकापूरमध्ये जीओच्या लाईन टाकण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अपूर्ण अवस्थेत असलेल्या या कामामुळे वाहनचालक, पादचार्‍यांना त्रास होत आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी ग्रामपंचायतीने याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

जीओची केबल टाकण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे, परंतु ते पूर्ण झालेले नाही. या बंद कामामुळे आता पावसाळ्यात याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे तातडीने याबाबत ग्रामपंचायतीने कारवाई करावी व गैरसोय दूर करावी, अशी मागणी श्री. जाधव यांनी केली आहे. खोदलेले गटार, टाकलेल्या केबल याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघात होण्याचीही शक्यता श्री. जाधव यांनी व्यक्त केली आहे.

Check Also

न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; कामांचा आढावा मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या …

Leave a Reply