Breaking News

डीव्हीसी स्पोर्ट्स शॉपचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त  – पनवेल, वाशी, बेलापूर, तसेच नवी मुंबईतील इतर शहरांच्या जोडीने उलवे नोड परिसर देखील विकसित होत आहे. यापूर्वी उलवेच्या नागरिकांना सर्वच सुविधांसाठी इतर ठिकाणी पायपीट करावी लागत होती, परंतु झपाट्याने होणार्‍या विकासामुळे उलव्यात आता अत्याधुनिक सोयीसुविधा येत आहेत.

या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अद्ययावत रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात आली असल्याने या परिसरातील खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, परंतु या खेळाडूंना खेळाचे साहित्य लागल्यास वाशी, पनवेल, तसेच मुंबईच्या दिशेने पायपीट करावी लागत होती. हीच गैरसोय लक्षात घेऊन दीपक चौधरी यांनी रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या समोरच डीव्हीसी स्पोर्ट्स शॉप या खेळाच्या साहित्यांनी सुसज्ज असे दुकान सुरू केले आहे. या दुकानाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष सय्यद अकबर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर अकबर लांबे, मनीष नारखडे, सचिन राजे यांचेदेखील विशेष सहकार्य लाभले.

उलवे परिसरात खेळाच्या दुकानाचा अभाव आहे. त्यामुळे इथल्या खेळाडूंना वेळेवर साहित्य उपलब्ध होत नसल्याने पालकांमध्ये व खेळाच्या प्रशिक्षकांमध्ये नाराजी पाहायला मिळत होती. ही बाब दीपक चौधरी यांनी विचारात घेऊन या शॉपमध्ये मैदानी खेळ, घरगुती खेळ, व्यायामाचे साहित्य, स्विमिंग किट, तसेच यासारख्या अनेक खेळांचे अद्ययावत साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. हे स्पोर्ट्स शॉप जरी अत्याधुनिक खेळाच्या साहित्यांनी परिपूर्ण असले, तरीदेखील या साहित्यांचे दर हे माफक असणार आहेत व ते सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना हमखास परवडतील अशी माहिती दीपक चौधरी यांनी दिली. रामशेठ ठाकूर यांनी बोलताना डीव्हीसी स्पोर्ट्स शॉपचे मालक दीपक चौधरी, प्रतिभा विलास चौधरी, मनीष नारखेडे, कुंदा नारखेडे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे कौतुक केले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply