Breaking News

आरोग्य महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात विचारविनिमय

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर 4 ऑगस्ट रोजी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात होणार आहे. महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात सोमवारी (दि. 29) रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, डॉ. सुहास हळदीपूरकर, डॉ. प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकारी, असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. या वेळी महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply