Monday , June 5 2023
Breaking News

दोन वाहनांच्या धडकेत एक ठार दोन जखमी

महाड : प्रतिनिधी

मुंबई – गोवा महामार्गावरील दासगाव गावाजवळ रविवारी (दि. 7) रात्री सव्वा अकराच्या सुमारास एका ट्रकने टेम्पोला समोरुन ठोकर दिली. या अपघातात टेम्पो चालक ठार झाला तर दोन प्रवाशी जखमी झाले. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दासगाव गावाजवळ रविवारी रात्री मुंबईकडे जाणार्‍या ट्रक  (जीजे-19,एक्स-3218) चा चालक संजीव नागोराव भालेराव याने ट्रक विरुद्ध दिशेला नेत समोरून येणार्‍या टेम्पो (एमएच-06,बीसी-4709) यास समोरासमोर ठोकर दिली. या अपघातामध्ये टेम्पो चालक कैलास गोपाल बंडगर (वय 38,  रा. नागाव, हातकणंगले, जि. कोल्हापूर) हा गंभीर जखमी होवून ठार झाला. तर विजय धोंडीराम इंगळे (वय 40) आणि ट्रक चालक संजीव भालेराव हे दोघेही जखमी झाले. विजय धोंडीराम इंगळे यांच्या तक्रारीवरून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply