Breaking News

भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी प्रवीण आम्रेंचा अर्ज

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदावरून सध्या कार्यरत असलेल्या संजय बांगरची गच्छंती अटळ असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आम्रे यांनी फलंदाज प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे बांगरचे पद धोक्यात आले आहे.

ऑगस्ट 2014पासून बांगर भारतीय संघाचा फलंदाज प्रशिक्षक असून, त्याने काही काळ मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारीही बजावली होती. जुलै 2016मध्ये अनिल कुंबळे मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर बांगरकडे पुन्हा फलंदाज प्रशिक्षकपद गेले. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखालीही बांगरकडे हेच पद कायम होते, पण इतकी वर्षे फलंदाज प्रशिक्षक असूनही बांगरला संघातील चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय शोधता आला नाही. त्याचा फटका टीम इंडियाला वर्ल्ड कप स्पर्धेतही बसला.

अरुण कायम राहणार?

गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्याकडे कायम राहणार आहे. मागील 18-20 महिन्यांत अरुण यांनी भारतीय गोलंदाजांसोबत केलेले काम कौतुकास्पद आहे. सध्याच्या घडीला भारताची गोलंदाजी ही जगातील सर्वोत्तम मानली जातेे. त्यामुळे त्यांना बदली करणे अवघड आहे, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे जाँटी र्‍होड्सने क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला असला तरी या पदी आर. श्रीधर यांच्या फेरनियुक्तीचे संकेत आहेत.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply