Breaking News

‘नाते तुमचे आमचे’चे अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सकाळ वृत्तपत्र समूह आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून ‘सकाळ प्रीमियर नाते तुमचे आमचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी खेळ पैठणीचा, दिलखुलास गप्पागोष्टी आणि अनेक कलाकारांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. 29) करण्यात आले होते. याचे उद्घाटन सुप्रसिद्ध कलाकार रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते आणि महापौर कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली.

कामोठे येथील वामनराव पै सभागृहात सकाळ वृत्तपत्र समूह आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने ‘सकाळ प्रीमियर नाते तुमचे आमचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी खेळ पैठणीचा, दिलखुलास गप्पागोष्टी तसेच अनेक सुप्रसिद्ध गायकांनी आपली गायनाची कला या वेळी सादर केली. या कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, सुप्रसिद्ध कलाकार धनश्री दळवी, नंदीता धुरी, दीपक डोबरीयाल, नरेश बीडकर, गायक राहुल सक्सेना, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका कुसुम म्हात्रे, संतोषी तुपे, पुष्पा कुत्तरवडे, अरुणा भगत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, महिला मोर्चाच्या प्रतिभा भोईर, कुंदा मेंगडे, लीना पाटील, सुलोचना कल्याणकर, श्वेता खैरे, मंगल घोलप, स्वाती केंद्रे, युवा नेते हॅप्पी सिंग, हर्षवर्धन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply