पनवेल : भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे आणि नावडे शहर युवामोर्चा अध्यक्ष जितेंद्र काटकर यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अनेश ढवळे आणि जितेंद्र काटकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पांडुरंग केणी, आत्माराम पाटील, रमेश राम सर, कृष्णा म्हात्रे, मिलिंद झुरे, राजेश पाटील, राजू सावंत, सचिन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.