Breaking News

पनवेल परिसरात छट्पूजेचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त

देशाच्या अनेक भागांमध्ये सूर्य उपासनेचा सर्वांत मोठा सण छट्पूजा साजरा केला जातो. आपली संस्कृती, श्रद्धा निसर्गाशी किती खोलवर जोडलेली आहे याचा पुरावा म्हणजे सूर्यपूजेची परंपरा आहे. त्यानिमित्त पनवेल शहरातील वडाळे तलाव, खांदेश्वर येथील तलाव आणि नवीन पनवेल येथील आदई तलावाजवळ छट्पुजेचे आयोजन सोमवारी (दि. 31) करण्यात आले होते. या पुजेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतले आणि जल अर्पण केले. नवीन पनवेल येथील आदई तलाव येथे रविवारीदेखील छट्पूजा झाली. शहरात विविध तलावांच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने सभा मंडप उभे करण्यात आले होते. छट्पुजेनिमित्त आदई तलाव येथे आयोजित कार्यक्रमावेळी माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक संतोष शेट्टी,  अ‍ॅड. मनोज भुजबळ, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, शिवाजी भगत, विवेक होन, अक्षय सिंह, कुलबीर चांदोक, रीमा रावल, छठ पूजा सेवा ट्रस्ट नवीन पनवेलचे बी. पी. सिंग, जितेंद्र तिवारी, सुनील सिन्हा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे, किशोर सिंग, तानाजी खंडागळे आदी उपस्थित होते. खांदेश्वर तलाव येथे आयोजित छट्पूजेवेळी माजी उपमहापौर सीताताई पाटील, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, युवा मोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी, प्रभाग क्रमांक 15 अध्यक्ष शांताराम महाडीक, रामनाथ पाटील, प्रेमा भोपी, आयोजक अवधेश शुक्ला, अनुपम शर्मा, भद्र शेट्टी, गजानन साळवी, विजय यादव, मनिषा पाटील उपस्थित होते. वडाळे तलाव येथे आयोजित छट्पुजेला माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रीतम म्हात्रे, विनय साह, विश्वनाथ साह, राजू ठाकूर, शंभू चौधरी, अलोक कुमार मंडळ, कुमार विभुटी आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply