उलवे : उलवे नोड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी चंदन कुंभार यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चंदन कुंभार यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. या वेळी भाजप नेते एम. डी. खारकर, राजेश खारकर, महेश सोमासे, गणेश सोमासे, दिलीप कोळी, नीलेश खारकर, समीर मडवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.