Breaking News

म्हातवलीच्या उपसरपंचपदी भाजपच्या सुमित्रा जाधव यांची बिनविरोध निवड

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील म्हातवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या सुमित्रा दिलीप जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.

म्हातवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी नाईक नगर विभागाला योग्य वेळी नक्की प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता बालदी यांनी सुमित्रा जाधव यांची उपसरपंचपदी निवड करून पूर्ण केली.

या वेळी सरपंच अनंत घरत, माजी सरपंच महेश घरत, ग्रामसेविका, ग्रामपंचायत सदस्य यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित उपसरपंच सुमित्रा जाधव यांचे उरण नगर परिषदेचे गटनेते आणि भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, तसेच वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले. याशिवाय उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह, अन्य नगरसेवक-नगरसेविका, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, सरचिटणीस सुनील पाटील, माजी सरपंच राकेश म्हात्रे, कार्यकर्ते सुभाष गोवारी आदींनी सौ. जाधव यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply