Breaking News

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना दिलासा

परीक्षा फी माफ; शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची माहिती

मुंबई ः प्रतिनिधी

दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी माफ होणार आहे. ही फी ठढॠडमार्फत थेट विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, असा निर्णय शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी (दि. 1) ट्विटरवरून दिली. त्यांनी एकूण तीन ट्विट केले असून परीक्षा फी माफीसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. राज्य सरकारचे नियम, त्यासंबंधीची सविस्तर माहिती, कोणत्या भागातील विद्यार्थ्यांना फी माफी मिळणार आहे, याची सविस्तर माहिती या ट्विटमधून देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. याआधी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीची प्रतिपूर्ती करताना फक्त परीक्षा फी माफ केली जात होती, मात्र प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्क मात्र आकारले जात होते. आता हे शुल्कदेखील माफ करण्यात आले आहे. यापूर्वी दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शाळा प्रस्ताव तयार करून शिक्षण अधिकार्‍यांना पाठवत असे. त्यानंतर शिक्षण अधिकारी आणि शिक्षण विभाग त्याला मंजुरी देऊन शाळेला हा निधी उपलब्ध करून दिला जात होता. मग फी विद्यार्थ्यांना परत मिळत असे. यामध्ये अनेक वेळा उशीर होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आता प्रतिपूर्तीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करून थेट विद्यार्थी अथवा पालकांच्या बँक खात्यात फीची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफीची ही सवलत शासकीय, अनुदानित माध्यमिक शाळा, तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही लागू असणार आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply