पनवेल प्रेस क्लबकडून वीज वितरण कर्मचार्‍यांचे कौतुक

पनवेल : प्रतिनिधी

मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते. वीजपुरवठा खंडित होणे ही नित्याचीच बाब असली तरी पनवेल परिसरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पनवेल वीज वितरण कार्यालयातील कर्मचार्‍यांनी अहोरात्र मेहनत घेतली. या कार्याची पनवेल प्रेस क्लब या पत्रकारांच्या संघटनेने दखल घेऊन त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे कौतुक केले.

पनवेल प्रेस क्लबचे सल्लागार विजय कडू, अध्यक्ष सय्यद अकबर, नीलेश सोनावणे, संजय कदम यांनी आपल्या पत्रकार सहकार्‍यांसह वीज वितरण पनवेल शहर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे, शाखा अभियंता दत्तात्रेय मोरे, अरुण लढे, किरण चौधरी, वामन कोळी, शुभांकीत श्रीवास्तव, विनय महाडिक, अमित कुरुंगळे यांच्यासह कार्यालयातील कर्मचार्‍यांचा विशेष सत्कार केला व सन्मानपत्राद्वारे सन्मान करण्यात आला. या वेळी पत्रकार विकास पाटील, संजय वाव्हळ, रवींद्र गायकवाड, गणपत वारगडा, असीम शेख, सनीप कलोते आदी पत्रकार उपस्थित होते. या वेळी मुस्लिम एकता सुरक्षा समिती पनवेल यांनीही वीज वितरण अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशस्तिपत्रक, शाल, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन अभिनंदन केले. या वेळी नगरसेवक मुकीद काझी, मुस्लिम एकता सुरक्षा समितीचे अध्यक्ष नवीद हुसेनमियां पटेल, सरचिटणीस इरफान तांबोळी, मत्तिन मास्टर, शगीर तांबोळी, अब्दुल पिंजारी, गफूर सय्यद, निसारी पिंजारी, शाहनवाज खलिफा आदी मुस्लिम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply