Breaking News

रविशेठ पाटील यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

नागोठणे : प्रतिनिधी

विभागातील शिहू, चोळे, बेणसे, गांधे, झोतीरपाडा (ता. पेण) या गावांत रविवारी पडलेल्या मुसळधार पावसाने पूर येऊन अनेकांचे नुकसान झाले होते. भाजपचे नेते, माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी या परिसरात येऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करून सर्व आढावा घेतला. या वेळी भाजपचे नेते मारुती देवरे, हिरामण कोकाटे, भास्कर म्हात्रे, जांभळे सर, लक्ष्मण खाडे, प्रशांत पाटील, वासुदेव म्हात्रे, के. के. कुथे, जगदीश कोकाटे, जानू कुथे, यशवंत घासे, केशव म्हात्रे, दीपक पाटील, कृष्णा म्हात्रे, मधुकर गडमले, मधुसूदन पाटील, मधुकर कुथे, गजानन कुथे, चंद्रकांत ठाकूर, प्रशांत म्हात्रे, प्रमोद कुथे, संजय कुथे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी पाटील यांनी सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना सरकारी अधिकार्‍यांना केल्या.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply