Breaking News

कलम 370 रद्द केल्याने नागोठण्यात आतषबाजी

Exif_JPEG_420

नागोठणे : प्रतिनिधी

काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा अभूतपूर्व निर्णय मोदी सरकारने सोमवारी (दि. 5) घेतला. या निर्णयाचे पडसाद नागोठण्यातसुद्धा उमटले असून, मंगळवारी (दि. 6) सकाळी 11 वाजता येथील शिवाजी चौकात भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली. रोहे तालुका भाजप अध्यक्ष सोपान जांबेकर, भाजपचे नेते मारुती देवरे, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र देशपांडे, ज्ञानेश्वर साळुंके, भाजप रोहे तालुका उपाध्यक्ष प्रकाश मोरे, सरचिटणीस आनंद लाड, किशोर म्हात्रे, असगर सय्यद, विवेक रावकर, मोरेश्वर म्हात्रे, सुरेश जैन, तिरतराव पोलसानी, शेखर गोळे, मनोज धात्रक, विठोबा माळी, विजय गोळे, राजेंद्र लवटे, सचिन मोदी, रऊफ कडवेकर, फातिमा सय्यद, इम्तियाज दफेदार, अनिल पवार, शिवसेनेचे शाखाप्रमुख कीर्तिकुमार कळस, बाळू रटाटे, दीपक गायकवाड, दीपिका गायकवाड, सुदेश येरुणकर, पांडुरंग म्हात्रे आदींसह कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते. या वेळी अनेक वक्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करणारी भाषणे केली.

कर्जत, नेरळमध्ये भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष

कर्जत, कडाव : बातमीदार

जम्मू-काश्मीरसाठी लागू करण्यात आलेले कलम 370 रद्द करण्याचे विधेयक सोमवारी राज्यसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. त्याबद्दल कर्जत आणि नेरळ शहरातील भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जम्मू-काश्मीरसाठी असलेले 370 कलम रद्द करण्याचे विधेयक भाजपने राज्यसभेत मांडले होते. ते बहुमताने मंजूर झाल्यानंतर देशभरात सोमवारी एकच जल्लोष करण्यात आला. नेरळमध्येही भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी हुतात्मा हिराजी पाटील चौकात फटाके फोडून जल्लोष केला. या वेळी युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात सेना-भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. या वेळी कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांनी फुगडी घातली, तर ज्येष्ठ शिवसैनिक मोहन ओसवाल यांनी नृत्य केले. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, भाजपचे जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, नगरसेवक बळवंत घुमरे, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजेश भगत, रायगड जिल्हा सोशल मीडिया सेलचे सहसंयोजक विलास श्रीखंडे, कुलाबा जिल्हा बजरंग दल संयोजक साईनाथ श्रीखंडे, सहसंयोजक रमेश नाईक, जिल्हा धर्मप्रसार प्रमुख महेश बडेकर, दीपक महाराज जगताप, विनायक चितळे, राजेश विरले, विशाल जोशी, कमलाकर किरडे, वैभव जोशी, अमोल ओसवाल, विक्रमसिंग राजपूत, अनंता हजारे आदींसह युतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply