पनवेल : रामप्रहर वृत्त
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35 अ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने सोमवारी
(दि. 5) घेतला. याबाबतचे पुनर्रचना विधेयक मंजूर झाल्याबद्दल संपूर्ण देशभर आनंद व्यक्त होत आहे. पनवेलमध्येही ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष करून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. या वेळी सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेलमधील वडाळे तलावाजवळ झालेल्या या आनंदोत्सवास आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष कल्पना राऊत, पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष संजय भोपी, महिला मोर्चा शहर अध्यक्ष व नगरसेविका मुग्धा लोंढे, नगरसेविका हेमलता म्हात्रे, विस्तारक अविनाश कोळी, मयुरेश नेतकर, अभिषेक पटवर्धन, प्रीतम म्हात्रे, महादेव घांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आमदार ठाकूर व श्री. घांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त करून केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले.