महाड : गेले काही दिवस सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण रायगडातील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा या तालुक्यांतील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. विशेषकरून महाडला मंगळवारी (दि. 6) पुराचा मोठा फटका बसला. सावित्री, काळ, गांधारी या नद्यांनी महाड शहरात प्रवेश केल्याने बाजारपेठेसह अन्य भागांत पाणी शिरले. दस्तुरी नाका, रायगड मार्ग, दादली पूलही पाण्याखाली गेला होता. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली. दरम्यान, महाडमधील वीजपुरवठा खंडीत झाला होता, तसेच फोनसेवाही ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. रात्री एनडीआरएफचे (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) पथक दाखल झाले आणि त्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्याचे कार्य हाती घेतले.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …