Breaking News

चिरनेर, मोहोपाड्यात उद्या पक्षप्रवेश सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त

उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना पक्षाच्या दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश सोहळा शुक्रवारी (दि. 9) सकाळी 10.30 वाजता चिरनेर येथील पी. पी. खारपाटील विद्यालयात आणि सायंकाळी 6 वाजता मोहोपाडा येथील जनता विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.                  

राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. या सोहळ्यास माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा सरचिटणीस व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

चिरनेर येथील पी. पी. खारपाटील विद्यालयात होणार्‍या कार्यक्रमात उरण भागातील, तर जनता विद्यालयात होणार्‍या कार्यक्रमात रसायनी विभागातील दिग्गज नेते भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply