Breaking News

‘त्या’ विद्यार्थ्याचा मृत्यू

कळंबोली, पनवेल : बातमीदार

वडिलांनी शाळेत जाण्यासाठी मोटरसायकल न दिल्याने न्यू सुधागड हायस्कूलमध्ये जाऊन स्वत:ला जाळून घेतलेल्या शिवम दीपक यादव (17) या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

कळंबोलीत राहणार्‍या शिवम यादव या अकरावीतील सायन्सच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी सकाळी न्यू सुधागड हायस्कूलमध्ये जाण्यासाठी वडिलांकडे मोटरसायकलची मागणी केली होती. वडिलांनी त्याला ती न दिल्याने रागाच्या भरात शिवमने त्याच मोटरसायकलमधील पेट्रोल एका बाटलीमध्ये काढून घेतले आणि त्यानंतर त्याने हायस्कूल गाठून दुसर्‍या मजल्यावरील शौचालयात जाऊन स्वतःला पेटवून घेतले. गंभीररीत्या भाजल्याने हायस्कूलमधील शिक्षकांनी शिवमला तत्काळ एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र 90 टक्के भाजल्यामुळे त्याला ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटर रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी शिवमचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या मूळ गावी कराडला नेण्यात आला, अशी माहिती पो. उपनिरीक्षक अर्चना चिवटे यांनी दिली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply