
खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा दहावा स्थापना दिन बुधवारी अत्यंत उत्साहात, तसेच विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. या वेळी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला, तसेच संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खारघर येथील दर्जेदार शिक्षणाचे केंद्र ठरलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा दहावा स्थापना दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध प्रकारच्या नृत्यांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, अर्चना परेश ठाकूर, सचिव एस. टी. गडदे, भार्गव ठाकूर, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजप नेते प्रभाकर जोशी, दीपक शिंदे, सुरेश ठाकूर, विनोद ठाकूर, कुंदा मेंगडे, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.