Breaking News

विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

आगरी शिक्षण संस्था खांदा कॉलनी येथे शुक्रवारी (दि. 9) नॅचरल हेल्थ अ‍ॅण्ड एज्युकेशन फाउंडेशन आणि स्टेपऑन ऑरगॅनिक सॅनिटरी नॅपकिन यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक पाळी, महिलांचे आरोग्य आणि जैविक सॅनिटरी नॅपकिन काळाची गरज या विषयावर आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी कार्यक्रम आयोजित केले होते. हा कार्यक्रम बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाअंतर्गत नॅचरल हेल्थ अ‍ॅण्ड एज्युकेशन फाउंडेशन आणि स्टेपऑन जैविक सॅनिटरी नॅपकिन यांच्या संयुक्त विध्यमाने सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, नीतामाळी, अनिता रणदिवे यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून पनवेल महानगर पालिका नगरसेविका सीताताई पाटील यावेळी उपस्थित होत्या. दीपक खाडे यांनी विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयी माहिती दिली. करण सिंग, रीमा रावल, सुनीता गुरव, भारती एकलारे, मुख्याध्यापिका सौ. तांडेल, सौ. सांळुखे आदि उपस्थित होते. या वेळी गरजूंना स्टेपऑन ऑरगॅनिक सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply