Breaking News

लायन्स क्लब व वुई क्लब उरणतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

उरण ः वार्ताहर

वैश्वी कातकारीवाडी येथे लायन्स क्लब व व्ही क्लब उरण तर्फे उरण तालुक्यातील वैश्वी कातकारीवाडी येथे गुरुवारी (दि. 8) आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. कातकर वाडीतील 70 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

त्यामधे नेत्र तपासणी, शरीरातील रक्ताचे प्रमाण, रक्तातील साखारेचे प्रमाण तपासणी, गरोदर महिलांची तपासणी नेत्र तपासणी जनरल तपासणी, दंत तपासणी आदी तपासणी करून मोफत औषधे व मोलाचे मार्गर्शन करण्यात आले. या वेळी लायन्स क्लब ऑफ उरणचे अध्यक्ष डॉ. अमोल गिरी व वुई क्लब उरणच्या अध्क्षया शीतल तेलंगे, लायन ऑय फाउंडेशन चोंढी (अलिबाग)चे शुभदा कुरतडकर, डॉ. अमोल गिरी व डॉ. अनिता कोळी, डॉ. सोनल कुठे, खजिनदार संध्याराणी ओहोल, सदस्य प्रकाश नाईक, अलका कुठे, प्रमिला गाडे, उत्तरा रुईकर, वंदना घरत तसेच इतर सदस्य वुई क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या. आभार लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल गिरी व वुई क्लबच्या अध्यक्षा शीतल तेलंगे व्यक्त केले.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply