Breaking News

भारताविरुद्ध विंडीजचा कसोटी संघ जाहीर

केपटाऊन  : वृत्तसंस्था

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर करण्यात आला आहे. विंडीज निवड समितीने शनिवारी (दि. 10) 13 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. या संघात सहा फूट पाच इंच उंच असलेल्या रहकीम कॉर्नवॉल याला स्थान देण्यात आले आहे, तर अनुभवी फलंदाज ख्रिस गेलला वगळले आहे.

भारतीय संघाचा सध्या वेस्ट इंडिज दौरा सुरू आहे. भारताने या दौर्‍यातील ट्वेन्टी-20 मालिका 3-0 अशी खिशात घातली. त्यानंतर एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पावसाने रद्द करण्यात आला. या मालिकेतील दुसरा सामना

रविवारी (दि. 11) होणार आहे.

भारत आणि विंडीजमध्ये 22 ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 22 ते 26 ऑगस्ट, तर दुसरा सामना 30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. हे दोन सामने टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवण्यात येणार आहेत.

वेस्ट इंडिज चॅम्पियन्सशिप आणि वेस्ट इंडिज ‘अ’ संघाकडून खेळताना कोर्नवॉलने दमदार कामगिरी केली आहे. त्याने 55 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत 23.90च्या सरासरीने 260 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय फलंदाजीत 24च्या सरासरीने एक शतक आणि 13 अर्धशतकेही नावावर आहेत.

गेलची इच्छा अपूर्ण

अनुभवी फलंदाज ख्रिस गेलला या संघात स्थान दिलेले नाही. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्यापूर्वी एक कसोटी सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र आता त्याची इच्छा अपूर्ण राहणार आहे.

संघ : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शमर्थ ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रॉस्टन चेस, रहकीम कॉर्मवेल, शेन डावरिच, शॅनन गॅब्रियल, शिमरॉन हेटमायर, शाय होप, कीमो पॉल, केमार रोच.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply