Breaking News

आवरे येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान दिन

उरण : प्रतिनिधी : आत्माराम ठाकूर मिशनचे जे. जे. ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आवरे येथे जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी या उद्देशाने विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.

या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनील वर्तक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या समवेत संस्थेचे खजिनदार वामन ठाकूर, मुख्याध्यापिका  कांचन थळी आणि शाळेच्या सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. विज्ञान प्रकल्पाचे मूल्यांकन परीक्षक म्हणून माध्यमिक शिक्षक निवास गावंड यांनी केले. विद्यार्थ्यांनी सुबक असे वैज्ञानिक प्रकल्प प्रदर्शनात मांडले होते. इयत्ता चौथी ते नववीपर्यंतच्या प्रत्येक वर्गातील प्रथम व द्वितीय क्रमांकास रोख पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांच्या इंग्रजी बोलण्याचे विशेष कौतुक करण्यात आले.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply